ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्ही एन नाबर प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

व्ही एन नाबर प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

प्रकाशन: 08 Mar 2022 04:36 PM
वाचन संख्या 122

बांदा |राकेश परब : श्री मंगेश कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मेडीअम स्कूल, बांदा प्रशालेत आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .मनाली देसाई यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून भारतीय प्रसिद्ध महिला इंदिरा गांधी, मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी विशेष म्हणजे प्रशालेतील शिक्षिकांनी आणि विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,राणी लक्ष्मीबाई ,करोना फायटर,प्रतिभाताई पाटील,किरण बेदी,लता मंगेशकर ,भारतीय वैज्ञानिक तेसी थॉमस या प्रसिद्ध भारतीय महिलांच्या वेशभूषा साकारल्या तसेच त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेची शैक्षणिक वाटचालीची भरारी उत्तुंग आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत यांनी प्रशालेतील समस्त महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स