ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पालघर येथे जागतिक महिला दिनी लेट्स री-सायकल प्रोजेक्ट अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पालघर येथे जागतिक महिला दिनी लेट्स री-सायकल प्रोजेक्ट अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप

प्रकाशन: 08 Mar 2022 01:56 PM
वाचन संख्या 64

बांदा /राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली ५ वर्षे लेट्स रिसायकल हा प्रोजेक्ट दुरवरून चालत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवत असून आज पर्यंत शेकडो विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. २०१८ साली सुरू झालेल्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील जुन्या सायकल जमा करून, त्या व्यवस्थित करून खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना मोफत देण्याची केलेली सुरूवात.

मुंबई – पुणे सारख्या शहरातील मुले बऱ्याचदा ६ महिने ते १ वर्ष वापरलेली सायकल एका कोपऱ्यात उभी करतात आणि नवीन सायकल साठी हट्ट धरतात, पालकांची परिस्थिती चांगली असल्याने आईवडील मुलांचे हट्ट पुरवतात. पण खेडेगावातील, आदीवासी पाड्यातील मुलांना जुनी सायकल मिळणे सुद्धा काठीण असते. एकतर वेळेत वाहने उपलब्ध नसतात त्यात गाडीचे तिकीट घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते अशात विद्यार्थी शाळा सुटल्यावर भर उन्हात ७-८ मैल चालत येतात हे कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून आणि सायकल मिळाल्यास वाचलेले २ तास वेळ अभ्यासासाठी वापरता येईल या उद्देशाने या उपक्रमाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली होती ती आता पालघर या ५व्या जिल्ह्यात येऊन पोहोचली आहे.आज पालघर येथील एस के पाटील विद्यामंदिर, माकूणसार,आगरवाडी येथील ११ मुलींना छोटेखानी कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोलाड आणि सुरेश कोलेकर, प्रगती भोने, प्यारेलाल भाडणे, पराग पाटील, जीवन बेलकर, मनीषा चौधरी आदी शिक्षक तर स्वाती चौधरी, संयोग मोहिते आणि निलेश गुरखा हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला संस्थेचे सुरज कदम, प्रीती पांगे, सचिन धोपट, सुविधा चव्हाण, साक्षी पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक गोलाड यांनी शाळेच्या वतीने कोकण संस्थेचे आभार मानले आणि कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यासातील गुणसंख्या नक्की वाढवतील असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर भविष्यात संस्थेने शाळेत सायकल बँक सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना खूप मदत करावी अशी विनंती केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती संस्थेचे पालघर जिल्हा प्रमुख अजित दळवी यांनी केले तर सुरेश कोलेकर यांनी आभार मानले.लेट्स रिसायकल वाटप करताना संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स