वयाच्या बाराव्या वर्षापासून केलेली तपश्चर्या फळास आली : पद्मश्री परशुराम गंगावणे.
चौके | अमोल गोसावी : आयुष्यात वयाच्या बाराव्या वर्षापासून चित्रकथी, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ ही कला चार तपाहून अधिक काळ तळागाळापर्यंत पोहोचवली ,याचे फलित म्हणजे हा पद्मश्री पुरस्कार असल्याचे मत पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन ,जागतिक मराठी दिन ,कै. डॉक्टर दादासाहेब वराडकर प्रथम स्मृतिदिना निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले.
यशस्वी होण्यासाठी सातत्य हवे. तुमच्या कामामध्ये सातत्य असेल, झोकून देत काम करण्याची जिद्द असेल तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी होता आणि याची दखल शासनालाही घ्यावी लागते असे विचार त्यांनी याप्रसंगी मांडले.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ,वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन, जागतिक मराठी दिन व डॉ. दादासाहेब वराडकर प्रथम स्मृतिदिनानिमित्त ….वंदना अंक प्रकाशन सोहळा ,विज्ञान दिन व मराठी दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले .
पद्मश्री परशुराम गंगावणे, मालवणी कवी व साहित्यिक रूजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कै. प्रा. शरद वराडकर यांनी सुरू केलेल्या वंदना वार्षिक अंक काही वर्षे बंद पडला होता .हा अंक नव्याने सुरू करण्यासाठी त्यांचे चिरंजीव श्री अजयराज वराडकर यांनी चालना दिली . विद्यार्थ्यांचे लेख ,कविता विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अशा अनेक बाबींनी हा अंक सजलेला आहे . अंकासाठी केंद्रीय सूक्ष्म लघु ,मध्यम , उद्योग मंत्री श्री नारायणराव राणे ,खासदार विनायकजी राऊत ,आमदार वैभवजी नाईक ,जि.प .अध्यक्षा संजना सावंत, शिक्षण व आरोग्य सभापती सौ अनीषा दळवी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव ,शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांचे शुभ संदेश लाभले आहेत .
विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा ,विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.जागतिक मराठी दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा ,निबंध स्पर्धा, इत्यादी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाचनालयाच्या नूतन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. वाचनालयासाठी तीन कपाटे व जवळपास पन्नास हजाराची पुस्तके श्री तुकाराम पेडणेकर यांनी भेट म्हणून दिली.श्री पेडणेकर यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .लायब्ररीच्या नूतनीकरणासाठी भूषण गावडे यांनी अनेक शिक्षक, विद्यार्थ्यांना सोबत घेत सुसज्ज लायब्ररी बनविण्यासाठी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी संस्थेच्या वतीने तीन वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले. यांचेही उद्घाटन करण्यात आले , माजी खासदार निलेश राणे यांच्या योजनेतून 50 टक्के अनुदानावरमिळणारे वॉटर प्युरिफायर श्री सुमित सावंत यांच्या सहकार्याने प्राप्त झाले.संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे ओंकार पवार ,संजय मेस्त्री यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .प्रमुख पाहुणे श्री पिंटो यांनी आपल्या काही मालवणी कविता सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली .या कार्यक्रमासाठी अनेकांचे हातभार लागले.स्वागत गीत, मराठी गीत ,विज्ञान गीत सादर करण्यासाठी संगीत शिक्षक श्री रामकृष्ण सावंत यांनी कार्यक्रमांमध्ये रंजकता आणली.पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांना दिलेले सन्मान पत्र कलाशिक्षक समिर चांदरकर यांनी स्वतः लिहून रंगविले आणि त्याला आकर्षक बनविले. सेवानिवृत्त शिक्षिका तांबे मॅडम यांनी सन्मानपत्र शब्दबद्ध केले.विज्ञान विभाग प्रमुख श्री महेश भाट यांनी सहकारी शिक्षकांना सोबत घेत विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी योगदान दिले .मराठी विभाग प्रमुख श्री संजय पेंडुरकर यांची प्रचंड धावपळ आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
मराठी विभागातील सहकारी शिक्षकांचे सहकार्य घेत त्यांनीही अनेक स्पर्धा आयोजित केल्या .वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुमोल सहकार्य केले.कार्यक्रम प्रसंगी संस्था सचिव सुनील नाईक , विजयश्री देसाई शालेय समिती अध्यक्ष बापू वराडकर ,खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, कर्नल शिवानंद वराडकर ,श्रद्धा नाईक , तुकाराम पेडणेकर , संगिता शिर्के ,हेमंत माळकर ,मंगल पाटील , मुख्याध्यापक एन के कांबळे, प्राचार्य जमदाडे ,देवयानी गावडे, शिरोडकर मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले. त्यांना प्रकाश कानूरकर व संजय पेंडुरकर यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन श्री हडलगेकर सर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)