ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आचरा श्री रामेश्वर सहकार सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत पॅनेल सपशेल पराभूत..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा श्री रामेश्वर सहकार सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत पॅनेल सपशेल पराभूत..!

प्रकाशन: 04 Mar 2022 02:10 PM
वाचन संख्या 113

सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजप पॅनेलचे अधिपत्य ..!

चिंदर | विवेक परब : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने नाट्यमय घडामोडी नंतर तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळविले शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला. या सोसायटीवर शिवसेनेची सत्ता होती या निवडणुकीत भाजपने आपली निर्विवाद सत्ता आणत शिवसेनेला जोर का झटका दिला आहे. 13 उमेदवारसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत 12 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले मात्र सेनेचा 1 उमेदवार एका मताने विजयी झाला होता. मात्र भाजप पुरस्कृत उमेदवारने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला.

भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केला. या विजयानंतर विजयी उमेदवारांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या सोसायटीची सन २०२१-२२ ते २०२६ -२७  या कालावधीसाठीची  निवडणूक आचरा केंद्र शाळेत घेण्यात आली होती.
भाजपप्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये  भाजप पुरस्कृत (सर्व साधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी) प्रिया वामन आचरेकर, समीर रघुवीर बांवकर, प्रफुल संजय घाडी, अवधुत रमाकांत हळदणकर, भिकाजी रावजी कदम, लवू नारायण मालंडकर, संतोष गणपत मिराशी, प्रशांत दाजी पांगे,  भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून  प्रमोद विष्णू कोळंबकर, अनुसुचित जाती / जमाती प्रतिनिधी मधून लक्ष्मण भिवा आचरेकर, महिला प्रतिनिधी निशा गुणाजी गांवकर, मनाली महादेव तोंडवळकर, इतर मागास वर्गीय प्रतिनिधी मधून धनंजय दत्ताराम टेमकर विजयी झालेत. सर्व विजयी उमेदवारांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणिस महेश मांजरेकर, आचरा जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडीस, निवडणूक पक्ष निरीक्षक-संतोष गांवकर, निलिमा सावंत, आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स