ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
वेंगुर्ले तालुका भाजपाच्यावतीने जागतिक मराठी राज्यभाषा दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले तालुका भाजपाच्यावतीने जागतिक मराठी राज्यभाषा दिन साजरा.

प्रकाशन: 28 Feb 2022 01:40 PM
वाचन संख्या 141

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यिक सौ.वृंदा कांबळी यांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब : जागतिक मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय शिरोडा येथे मराठी  राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला.
जिल्हयातील प्रख्यात लेखिका व कांदबरीकार साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांच्या हस्ते गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर समारंभ स्थळी प्रमुख पाहुण्याचे आगमन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन या शाळेचे श्री एस्.एल्.कदम सर यांनी केले. मराठी गीत सादर करुन व गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या प्रतिमेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.एस्.कौलापूर यांच्या हस्ते पुष्पहार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करुन दिली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांनी आपले विचार मांडले. पी.के.कुबल यांनी मराठी दिनानिमित्त स्वरचित कविता सादर केली. त्यानंतर “आनंदयात्री” या ग्रुप मधील सौ.सुरेखा देशपांडे यांनी आपली “आई” हि कविता सादर केली. स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शिरोडा शहर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राथमिक शाळेमध्ये मराठी मध्ये शिक्षण किती गरजेचे आहे व त्याच आपल्या घरामध्ये सुध्दा मराठी भाषेचे वापराचे सातत्य ठेवणे व दशावतारी लोककलेचे  महत्व या संदर्भात आपले विचार मांडले.

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने जिल्हयातील प्रख्यात लेखिका व साहित्यिक  सौ.वृंदाताई कांबळी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कौलापूरे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती सौ.वृंदा कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर श्री.पी.एस कौलापूरे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या वेळी मान्यवर म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळूस्कर, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.समृद्धी धानजी, उपतालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे मान्यवर म्हणून उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी केले .या कार्यक्रमाला भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, सरचिटणीस सुरेश म्हाकले, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख  विदयाधर धानजी,महादेव नाईक, विजय बागकर, शिरोडा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, भाजप शिरोडा पदाधिकारी वासुदेव आरोस्कर, आरवली भाजप पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे, एकनाथ साळगांवकर, त्याच प्रमाणे आनंदयात्री ग्रुपचे आशिष वराडकर, जे.जे.पाटील सर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स