ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरे गांवची 'यशराज प्रेरणा संघटना' ठरली बॅरिस्टर नाथ पै युवाशक्ती पुरस्काराची मानकरी..!

आचरे गांवची 'यशराज प्रेरणा संघटना' ठरली बॅरिस्टर नाथ पै युवाशक्ती पुरस्काराची मानकरी..!

प्रकाशन: 21 Feb 2022 11:07 PM
वाचन संख्या 85

चिंदर | विवेक परब : गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे गांवची ‘यशराज प्रेरणा संघटना’ ही सामाजिक संस्था त्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. त्या उपक्रमांची दखल आता विविध स्तरांवर घेतली जात आहे.

नुकताच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅरिस्टर नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला बाबूकाका अवसरे, बाबाजी भिसळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी ‘यशराज प्रेरणा संघटनेचे’ अध्यक्ष श्री मंदार सरजोशी व ॲड. सायली आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. शामराव जाधव, श्रीकांत सांबारी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, निलेश सरजोशी, सुरेश गांवकर,शिल्पन गांवकर, सर्व कोमसाप पदाधिकारी कार्यकर्ते  कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स