इन्सुली गावठणवाडी येथे शिवजयंती उत्सव.
बांदा | राकेश परब : शिवजयंती निमित्त इन्सुली येथे ग्रामस्थांच्या वतीने गावठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे व इन्सुली गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ठीक ७.३० वाजता उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ डोबाचीशेळ यांच्या वतीने मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ही मशाल यात्रा सातजांभळं देवस्थान ते खांमदेव नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गावठण वाडी अशा मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. तर सकाळी ९ वाजता इन्सुली कोनवाडा येथील सांस्कृतिक हॉल येथे शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गावठण पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन इन्सुली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)