ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणातील दांडी झालझुल वाडीत मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याच्या शिबिराला उत्तम प्रतिसाद.

मालवणातील दांडी झालझुल वाडीत मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याच्या शिबिराला उत्तम प्रतिसाद.

प्रकाशन: 16 Feb 2022 12:04 AM
वाचन संख्या 47

मालवण | विनीत मंडलिक : मालवणच्या नगरसेविका तृप्ती मयेकर, नगरसेविका सेजल परब , नगरसेवक पंकज सादये या शिवसेनेच्या नगरसेवकांचा  मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याच्या उपक्रम  दांडी झालझुल वाडी येथील जयसिंग पराडकर निवास स्थानी आयोजीत करण्यात आला. 


या शिबिराला नागरिकांनी उत्तम  प्रतिसाद दिला. या शिबिरात सुमारे 65 नागरिकांनी आपला  आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक  लिंक करून घेतला.त्याच प्रमाणे काहींना आपला जुना मोबाईल क्रमांक  बदलून  नवीन क्रमांक  अपडेट करून देण्यात आला.   ज्या नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही अश्या नागरिकांना घरी जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक  लिंक करून दिला गेला .
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोस्ट कर्मचारी श्री  अमोल माळकर( बागायत पोस्ट)  कुमारी प्राची पाटकर (देवबाग पोस्ट)  आणि  श्री विजय तारी (वायरी पोस्ट ) यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल नागरिकांनी त्यांचे व आयोजकांचे विशेष आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स