ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मनोहर मालंडकर शिक्षक भारतीतून पुन्हा स्वगृही शिक्षक समितीत दाखल

मनोहर मालंडकर शिक्षक भारतीतून पुन्हा स्वगृही शिक्षक समितीत दाखल

प्रकाशन: 14 Aug 2021 05:36 PM
वाचन संख्या 274

कट्टा येथील कार्यक्रमात शिक्षक समितीत प्रवेशकर्ते.

पोईप | ओंकार चव्हाण : गेल्या दीड महिन्यांपूर्वी शिक्षक मनोहर मालंडकर हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला सोडचिठ्ठी देत शिक्षक भारती या संघटनेत प्रवेशकर्ते झाले होते.परंतु अल्पावधीतच शिक्षक समितीची असणारी लोकशाही पद्धत व सर्वसमावेशक अशी कार्यपद्धती,सभासदांना देण्यात येणारी मैत्रीपुर्वक व आपुलकी आदराची वागणूक दुसऱ्या संघटनेत दिसून न आल्याने ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.शिक्षकांना न्यायाची व सन्मानाची भूमिका शिक्षक समितीच देऊ शकते ही धारणा पक्की झाल्याने शिक्षक समितीच्या विचारधारेत पुन्हा समाविष्ट होत असल्याची भावना यावेळी मालंडकर यांनी व्यक्त केली.अल्प काळ आपण अन्य संघटनेत राहिलो,तिकडे गेल्यावर मला मानसन्मान देण्याचे,माझे मत उचलून धरून कार्यवाही करण्याची केवळ दिखाऊ कृती करण्यात आल्या.परंतु खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे याची प्रचिती आपणास अन्य संघटनेत आल्याचे मालंडकर यांनी सांगत यापुढे प्राथमिक शिक्षकांनी केवळ आणि केवळ शिक्षक समितीवरच विश्वास दाखवावा.शिक्षक समितीच शिक्षकांची तारणहार आहे असे मत व्यक्त करत प्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांचे हस्ते सत्कार स्वीकारत मनोहर मालंडकर हे स्वगृही दाखल झाले.यावेळी शिक्षक समिती मालवणचे तालुका अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण,सचिव नवनाथ भोळे सल्लागार श्रीकृष्ण सावंत, जिल्हाउपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे ,शिक्षक नेते मंगेश कांबळी,कार्याध्यक्ष रूपेश गरुड,पतपेढी संचालक राजेंद्रप्रसाद गाड,ज्येष्ठ सल्लागार अरुण गोसावी,जिल्हा संघटक प्रकाश झाडे तसेच
बाळकृष्ण नांदोसकर,संतोष नेरकर, भाग्यश्री वाडकर,सुयोग धामापूरकर,दिनेश ठाकूर,रेखा वंटे,कल्पना परब,सावली सुर्वे,सौ.गोसावी मॅडम, राजेंद्र गोसावी,तानाजी गावडे,प्रकाश पवार,अपर्णा माईणकर,हनुमंत आखाडे,प्रमोद राणे,प्रदीप सावंत,विकास घाडीगांवकर,दीपक गोसावी,मारुती चव्हाण आदी समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स