रामगड हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पोईप |ओंकार चव्हाण : प्रगत विद्यामंदिर रामगड या प्रशालेचा शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ चा इ १०वीच्या वर्गाचा निकाल १००% लागला त्यामुळे पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड व प्रगत विद्यामंदिर रामगड यांच्या वतीने इ १० वीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रममाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते या प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांनी कृ प्राची धाकु मेस्त्रीहिला ९८.२०%गुण मिळाले द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी कु. अमिषा अनंत बाईत हिला ९१. ६०% गुण मिळाले या तीनही विद्यार्थीनीचे संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. सु. रा. तळवडूकर यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्यास ५००/- बक्षीस तर संस्थेचे सचिव मा. श्री. वि. म. मटकर यांच्या कडून प्रत्येक विद्यार्थ्यास भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रमाणे कु. सुजाता हरणे, कु मानसी हाटले, कु तन्वी घाडीगावकर, कु तन्वी भामले,कु निकीता ढवसर, कु मयूरी पराडकर, कु विशाखा पाटकर या विद्यार्थ्यांचा विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मा.श्री. वि. म. मटकर यांच्याकडून भेट वस्तू व गुलाब पुष्प देवून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशालेतील दहावीच्या वगातील शिल्लक राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रत्येक वर्षी प्रशालेचा दहावीचा निकाल १००% लागला याही वर्षी दहावीचा निकाल १००% लागल्या बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम वंळजू यांनी दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शिक्षण घेताना कोणती काळजी घ्यावी तसेच पुढील शिक्षणासाठी आई वडील शिक्षक यांच मागदशन कसे घ्यावे याबाबत मागदशन केले तसेच संस्थेचे सचिव मा श्री.वि.म. मटकर यांनी विद्यार्थ्यानी रामगड हायस्कूलमध्ये असताना ज्या प्रमाणे गुणवत्ता दाखविली त्याच प्रमाणे पुढील शिक्षण घेताना गुणवत्ता दाखवावी तसेच मोठे झाल्यावर रामगड हायस्कूलला मात्र विसरू नये याबाबत मागदशन केले संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री सु रा तळवडेकर यांनी पुढील प्रवेश घेताना योग्य ध्येय ठेवून आपला प्रवेश निश्चित करावा व त्या प्रमाणे शिक्षण घ्यावे या बाबत मागदशन केले संस्थेचे अध्यक्ष मा श्री वा स प्रभू देसाई व जे संस्था संचालक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही त्यांनी फोन वरून उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री सु रा तळवडेकर संस्थेचे सचिव मा श्री वि म मटकर संस्था संचालक मा श्री सुभाष धुरी, मा श्री घनश्याम चव्हाण तसेच प्रशालेच मुख्याध्यापक मा श्री ए एम वंळजू सर्व विद्यार्थी उपस्थित होते सहरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक एस. एच .कांबळे, यांनी केले तर आभार प्रशालेचे शिक्षक श्री डी. डी .सावंत, यांनी मानले दहावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम हा कोव्हीडचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)