ईशान किशनने रचला इतिहास…!
आय.पि.एल.इतिहासातला सर्वात महागडा यष्टीरक्षक…!
बेंगळुरु | क्रीडावृत्त : आय.पि.एल.2022 च्या महालिलावात पहिल्या दिवशीच्या पहिल्या चरणात इतिहास रचला गेला आहे..!
मुंबई इंडिअन्सनेच सोडलेला यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला मुंबई इंडिअन्सनेच 15 कोटी 25 लाख इतक्या विक्रमी रकमेत विकत घेतलेले आहे. एखाद्या यष्टीरक्षकासाठी ही आजपर्यंतचा इतिहास बदलणारी सर्वोच्च अशीच ही बोली असून आय.पि.एल.च्या इतिहासातील तो दुसर्या क्रमांकाचा महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंगचा 16 कोटीचा विक्रम मात्र अबाधीत राहीला आहे.
मुंबई इंडिअन्सला या बोलीसाठी पंजाब व हैद्राबाद फ्रॅन्चायझीने कडवी टक्कर दिली.
युवा इशान किशनसाठी मुंबई इंडिअन्सन सोबत पुन्हा रहाण्यासोबतच घसघशीत विक्रमी बोलीचा बोनस मिळाला आहे.
इशान किशनच्या रुपाने मुंबई इंडिअन्सने त्यांच्या खेळाडू खरेदीचे खाते उघडले आहे. आजपर्यंत गेल्या चौदा वर्षांत मुंबई इंडिअन्सने एकाही खेळाडुला 10 कोटीपेक्षा जास्त रकमेने खरेदी केलेले नव्हते.त्यामुळे या खरेदीनंतर जगातील इतर अंदाज तज्ञांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)