बांदा तलाठी कार्यलयात महाराजस्व अभियान शिबीर संपन्न.
बांदा | राकेश परब : महाराजस्व अभियाना अंतर्गत बांदा महा ई सेवा केंद्रातून तयार करण्यात आलेल्या विविध दाखल्यांचे वाटप सावंतवाडी प्रांताधिकारी मा.श्री .प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
नागरिकांच्या अनेक दाखल्यांच्या समस्यांवर महाराष्ट्र शासनाने एक अधिसूची काढून हे दाखले विभाग वार नागरिकांना द्यावे.तसेच शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी अश्या शिबिरांचे आयोजन करण्यात येते असे सावंतवाडी प्रांताधिकारी मा.श्री .प्रशांत पानवेकर यांनी सांगितले.बांदा दशक्रोशी मधून अनेक नागरिकांना विविध दाखल्यांचे पानवेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे ,बांदा मंडळ अधिकारी आर .वाय .राणे ,बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी ,डेगवे तलाठी सुधीर नलावडे ,तांबोळी तलाठी नेत्रा सावंत,असनिये तलाठी भिंगारे ,बांदा महा ई सेवा केंद्राची संचालिका सौ.सुनीता आईर आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)