ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे कावावाडीच्या कन्या अनिता आचरेकर बनल्या शिव स्वराज्य जनरल कामगार युनियनच्या पुणे जिल्हाध्यक्ष.!

मसुरे कावावाडीच्या कन्या अनिता आचरेकर बनल्या शिव स्वराज्य जनरल कामगार युनियनच्या पुणे जिल्हाध्यक्ष.!

प्रकाशन: 04 Feb 2022 03:28 PM
वाचन संख्या 277

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शिवस्वराज्य जनरल कामगार युनियन ,पुणे जिल्हा अध्यक्षपदी मूळ मसुरे कावावाडी येथील कन्या आणि आचरा येथे घर असलेल्या अनिता गणेश आचरेकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे, आचरा आणि पुणे मध्ये अभिनंदन होत आहे.अनिता आचरेकर यांच्या निवडीचे पत्र शिवस्वराज्य जनरल कामगार युनियनचे महासचिव संजय पडवळ यांनी दिले.
या वेळी महाराष्ट्रा पत्रकार अभिजित बापट,अध्यक्ष नितीन घोसाळकर, महासचिव संजय पडवळ, वैभव पास्ते, शारुख मुजावर, प्रसाद बिराजदार, विकी पाटोळे, सौरभ कौलगे, शोभा मॅडम उपस्थित होते. अनिता आचरेकर या महाराष्ट्र मनसे माथाडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष पदावर ही कार्यरत आहेत. यावेळी बोलताना अनिता आचरेकर म्हणाल्यात सर्व समाजातील घटकांना या संघटनेमार्फत योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण अविरत असे परिश्रम करणार असून शिवस्वराज्य जनरल कामगार युनियन ला आदर्श असे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. अनिता आचरेकर यांचे पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, कला, सास्कृतिक आणि कामगार चळवळ यामध्ये मोठे योगदान आहे, पुणे जिल्ह्यामध्ये महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हिरिरीने प्रयत्न केले होते.आचरा येथे घर असलेल्या अनिता आचरेकर या मसुरे कावा वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गिरकर यांच्या कन्या आहेत. प्रसिद्ध भजनी बुवा नामदेव गिरकर यांच्या त्या भगिनी आहेत. अनिता आचरेकर यांच्या निवडीबद्दल मसुरे गावात स्पृहणीय आनंदाचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स