ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आडवली प्रतापवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव!

आडवली प्रतापवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव!

प्रकाशन: 03 Feb 2022 03:56 PM
वाचन संख्या 73

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आडवली प्रतापवाडी येथील श्री सावरदेव गणपती सेवा मंडळातर्फे ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक व गणेश पूजन, १० वाजता कीर्तनकार आरती बापट यांचे कीर्तन, १२.३० वा. गणेश जन्माच्या कथेने कीर्तनाची सांगता, गणेश जन्म पाळणा व आरती, दुपारी १ ते ३पर्यंत तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ३.३० वा. हळदीकुंकू समारंभ. यावेळी महिला सक्षमीकरण विषयावर बाळकृष्ण नाणेकर यांचे मार्गदर्शन व्याख्यान आहे. सायंकाळी ५ते ७ पर्यंत स्थानिक भजन मंडळांची भजने, रात्री ८ ते १० पर्यंत श्रींची पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘शिवस्वराज्य गाथा’ हा सांगितीक कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वयंभू श्री सावरदेव गणपती सेवा मंडळाने केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स