कालावल खाडिपात्रातील १५ अनधिकृत वाळूचे रॅम्प केले उद्धस्त..!
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात बुधवारी दिवसभर तीन ठिकाणी मसुरे मंडळ अधिकारी एस. आर.चव्हाण यांनी धडक कारवाई करत अनधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठी उभारलेले १५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने वाळू व्यावसाईकात खळबळ उडाली आहे. खाडी पात्रा लागत बांदिवडे खुर्द कोईल, सय्यद जुवा, आणि डांगमोडे येथे ही धडक कारवाई करण्यात आली.
यावेळी बांदिवडे खुर्द सरपंच श्री साटम, मसुरे पोलीस विवेक फरांदे, तलाठी टी. जी. गिरप, रविराज शेजवळ, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, विकास पोयरेकर, तसेच पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, सोमा ठाकूर, साटम, उपस्थित होते. यापूर्वी सुद्धा मसुरे मंडळ कार्यक्षेत्रात अनधिकृत वाळू वाहतूक व उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. यापुढील काळात आणखी कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)