मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे स्वियसहायक मिलिंद नार्वेकर यांना धमकी
मागण्या पूर्ण करा नाही तरी चौकशी लावू आणि अडकवू असा मेसेज
ब्युरो न्यूज:- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे स्वियसहायक मिलिंद नार्वेकर यांना व्हाट्सअँपद्वारे मेसेज करून धमकी देण्यात आलीय. मागण्या पूर्ण करा नाही तर सीबीआय, ईडी आणि केंद्रीय यंत्रणेद्वारे चौकशी लावू आणि अडकवू अश्या धमकीचा मेसेज अज्ञात इसमाकडून मिलिंद नार्वेकर यांना पाठविण्यात आलाय. या संदर्भात नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुंबई च्या गुन्हे शाखेकडून त्याचा तपास करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे अज्ञात इसमाकडून हे मसेज येत आहे असे स्पष्ट झाले आहे. मागण्या अजून काय आहेत, हे जरी स्पष्ट झालेले नसले तरी त्या संदर्भात आलेला मेसेज अतिशय खळबळजनक आहे. ही धमकी व्हाट्सअँप चॅट मध्ये असल्यामुळे त्या अज्ञात इसमाचे लोकेशन, नाव, नंबर ट्रेस करून येत्या २४ तासात त्या आरोपीला अटक होण्याची शक्यता पोलीस गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)