ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
४८ खेड्यांचे आराध्य दैवत असलेल्या डेगवे गावच्या श्री स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव ७ फेब्रुवारी रोजी.

४८ खेड्यांचे आराध्य दैवत असलेल्या डेगवे गावच्या श्री स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव ७ फेब्रुवारी रोजी.

प्रकाशन: 02 Feb 2022 11:24 AM
वाचन संख्या 93

बांदा |‍ राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या,४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव” सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होत आहे.


सदर जत्रोत्सवात सकाळी धार्मिक कार्यक्रम,दुग्धाभिषेक,मानकरी,देवस्थान समितीचे पदाधिकारी,गावरहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम ,सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते,गावगाराणे,देवतांची पालखी मंदिरात आणणे.त्यानंतर नवस करणे,फेडणे,ओटी भरणे नारळ,केळी,साखर ठेवणे असे विविध कार्यक्रम दिवसभर आयोजित केले आहेत.
त्यानंतर रात्री भजन, महाआरती,व मंदिरा भोवती पालखी काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री “चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे” “वज्र शल्क” हा नाट्य प्रयोग आयोजित केला आहे.त्याचा नाट्य रशिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.


या जत्रोत्सवाला मुंबई,पुणे,रत्नागिरी,बेळगाव,कर्नाटक,गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवतांचे दर्शन घेत असतात.
यावेळी मंदिर जिर्णोध्दाराकरीता प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी दिनदर्शिका २०२२” चे वितरण करण्यात येणार आहे.
तरी सर्व भाविकांनी करोनाचे नियम व मास्क वापरून दर्शन घ्यावे. अशी विनंती गावरहाटी, देवस्थान समिती, व मानकरी, यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स