बांद्यातील नाबर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल व विज्ञान विषयाचे मार्गदर्शन.
बांदा | राकेश परब : श्री.मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन .नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल,बांदा येथे मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित विषयासंदर्भात मार्गदर्शन ठेवण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री. एच. एम. पेडणेकर उपस्थित होते.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. श्री. पेडणेकर यांनी भूगोल व विज्ञान या विषयाचा समन्वय कसा साधावा,या विषयांचे महत्त्व, करिअरच्या संधी या संदर्भात मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांकडून भूगोल विषयासंदर्भात प्रात्यक्षिके करून घेतली.विद्यार्थ्यांनी एस. एस .सी. परीक्षेचा या विषयांचा अभ्यास कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेला या विषयाशी संबंधित शैक्षणिक साहित्य भेट दिले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश कामत , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी पेडणेकर यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)