ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
समाज साहित्य संघटनेतर्फे २७ फेब्रुवारी मालवणी कविसंमेलनाचे आयोजन.

समाज साहित्य संघटनेतर्फे २७ फेब्रुवारी मालवणी कविसंमेलनाचे आयोजन.

प्रकाशन: 02 Feb 2022 04:02 AM
वाचन संख्या 76

मराठी भाषादिनानिमित्त आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मालवणी कवयित्री व साहित्यिका डाॅ.सई लळीत.

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे मराठी भाषादिनाचे औचित्य साधून रविवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. मालवणी बोली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ऑनलाईन होणाऱ्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवयित्री डॉ. सई लळीत यांची निवड करण्यात आली आहे. मालवणी बोली कवितांमध्ये ज्यांचा काव्यसंग्रह प्रथम प्रसिद्ध झाला त्या ज्येष्ठ कवी दा. र. दळवी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कविसंमेलनासाठी कवी रुजारीओ पिंटो, प्रा.नामदेव गवळी, वैभव साटम, कल्पना बांदेकर, सुनंदा कांबळे, श्रेयश शिंदे, दिलीप चव्हाण, बाबू घाडीगांवकर आणि स्वप्नील वेंगुर्लेकर आदी कवींना निमंत्रित करण्यात आले आहे.
कोणतीही प्रमाण भाषा बोलीमुळे समृद्ध होत असते. प्रमाणभाषा दीर्घकाळ टिकते यामागे त्या भाषेच्या बोलींच योगदान महत्त्वाचं असतं. जर बोलीभाषा संपल्या तर प्रमाणभाषाही संपून जाते. ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ गणेश देवी यांच्या संशोधनानुसार 220 बोलीभाषा नष्ट झाल्या आहेत. अशावेळी बोलींचे संवर्धन महत्त्वाचे ठरते. मराठी भाषा दीर्घकाळ टिकवायची असेल तर मालवणी सारख्या अनेक बोलींचे स्थान अबाधित ठेवायला पाहिजे आणि बोली भाषा टिकविण्यासाठी त्यातून विविध साहित्याची निर्मिती होणे व ते साहित्य लोकांपर्यंत सातत्याने पोहचविले पाहिजे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषादिना सदर मालवणी बोली कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या डॉ.लळीत या गेली अनेक वर्ष निष्ठेने मालवणी बोली कविता लिहीत आहेत. एक हास्य कलाकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा ‘वांगड’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून अलीकडेच त्यांच्या कवितांचा नाट्याविष्कारही सादर करण्यात आला आहे. त्यांचे हे मालवणी बोली कवितांचे योगदान लक्षात घेऊन त्यांची कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स