ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कट्टा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.

कट्टा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.

प्रकाशन: 30 Jan 2022 11:37 PM
वाचन संख्या 22

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महात्मा गांधींच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त सेवांगण कट्टा शाखेत शिवणवर्गाच्या विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.दहा मुलिंनी महात्मा गांधीच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी किशोर शिरोडकर यांनी महात्मा गांधींनी नेहमीच महिला सबलीकरणासाठी रचनात्मक कार्यक्रम आखले याचा उल्लेख करुन शिवणक्लासच्या मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सेवांगण उपक्रम आखणार असल्याचे सांगितले.
दीपक भोगटे यानी महात्मा गांधींचे जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखीत करीत टॉलस्टॉय, आल्बर्ट आईनस्टाईन, नेल्सन मंडेला, बराक ओबामा या महनीय व्यक्तींवर गांधींचा प्रभाव समजावून दिला.
स्पर्धेचे परीक्षण रमेश म्हाडगुत व किशोर शिरोडकर यानी केले.
सुजाता पावसकर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळवडेकर, रमेश म्हाडगुत, दीपक भोगटे, सुजाता पावसकर व शिवणक्लासच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.

प्रथम क्रमांक : प्राची संतोष गावडे. द्वितीय क्रमांक : योगीता बाळकृष्ण चव्हाण. तृतीय क्रमांक : गीतांजली रामचंद्र शेटये.
चतुर्थ क्रमांक : सोनिका कमलाकर हाडये.
मंगल राजन गावडे,माधुरी संतोष खटावकर.
उत्तेजनार्थ : सानिका सचिन गावडे, विजया विजय वराडकर.
रेश्मा राजेंद्र फोपळे,यज्ञा राजेंद्र फोपळे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स