ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेवंडीच्या श्री देवी भद्रकाली मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.

रेवंडीच्या श्री देवी भद्रकाली मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 30 Jan 2022 11:22 PM
वाचन संख्या 58

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री भद्रकाली देवी मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त ४ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ रोजी दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद, रात्री स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम, ५ रोजी दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद,रात्री बाळकृष्ण गोरे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग. ६ रोजी सत्यनारायण महापूजा सकाळी ११ वा, दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद, दुपारी हळदीकुंकू कार्यक्रम. रात्री ९ वाजता आमने-सामने डबलबारीचा सामना (बुवा-अभिषेक शिरसाट विरुद्ध बुवा प्रवीण सुतार), ७ रोजी दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद, रात्री रेवंडीतील महिलांचे विनोदी नाटक-‘मीराबाई नॉट आऊट’ . ८ रोजी दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद, दुपारी ४ वाजता गणपतीची विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स