ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गावठी बाँबसह काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीस घेतले ताब्यात..!

गावठी बाँबसह काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीस घेतले ताब्यात..!

प्रकाशन: 29 Jan 2022 11:40 PM
वाचन संख्या 80

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली कारवाई..

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा सटमटवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून गावठी बाँम्ब सह काडतुसे बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी सादीक अन्वर खान (रा.बांदा-सटमटवाडी), या
संशयिताला ताब्यात घेतले. घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल ८९ गावठी बॉम्बसह दोन बंदुकीच्या नळ्या, चार काडतुसे असा शिकारीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. तर मिळालेल्या गावठी बॉम्बची किंमत अंदाजे तीस हजार इतकी आहे. दरम्यान ते आपल्याजवळ बाळगणाऱ्या खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


यावेळी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बागाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्य पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र घाग, सचिन शेळके, अवधुत बनकर, अमित गोते आणि बांदा पोलिस आदींच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स