ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पत्रकार संतोष गावडे यांचा शैक्षणिक व सामाजिक आदर्श..!(विशेषवृत्त)

पत्रकार संतोष गावडे यांचा शैक्षणिक व सामाजिक आदर्श..!(विशेषवृत्त)

प्रकाशन: 26 Jan 2022 03:03 PM
वाचन संख्या 173

माता आणि पिता यांच्या स्मरणार्थ करतात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

चौके | अमोल गोसावी (विशेषवृत्त) : मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चौके प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देउन गुणगौरव करण्यात आला.
दरवर्षी चौके मराठी शाळेतील परीक्षेमध्ये चांगल्या प्रकार गुण मिळविणार्‍या मुलांचा गुणगौरवांचा कार्यक्रम केला जातो. प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलांचा गुणगौरव केला जातो. कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे गेली दोन वर्ष हा गुणगौरव कार्यक्रम जाहीररित्या करण्यात आला नव्हता. मात्र या वर्षी हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमीत्त पार पाडण्यात आला. पत्रकार संतोष गावडे हे आपले वडील कै. बाबाजी गावडे व आई कै. सत्यभामा गावडे यांच्या स्मरणार्थ चौके प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करतात.


दरम्यान आज पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी चौके सरपंच राजा गावडे, उपसरपंच सौ. नाईक, चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ स्थानिक कमिटी अध्यक्ष बिंजेद्र गावडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष कृष्णा चौकेकर, सुरेश चौकेकर, दत्ता गावडे, ग्रा. प. सदस्य मनोज चौकेकर, विजय चौकेकर , मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम, तसेच ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी श्री. संतोष गावडे, सुरेश चौकेकर, बिजेंद्र गावडे यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स