ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वीर महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज अनावरण...!

वीर महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज अनावरण...!

प्रकाशन: 23 Jan 2022 11:55 AM
वाचन संख्या 131

शिरगांव | संतोष साळसकर : हिंदुस्तानातील एक जाज्वल्य तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले वीर महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगांव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक २३ जानेवारी २०२२) सायंकाळी सात वाजता होणार आहे. मुंबईमध्ये ममाझगांव परिसरातील प्रभाग क्रमांक http://localhost/news/public/uploads/209 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे.मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात 23 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2018 रोजी एक बैठक झाली होती.या बैठकीत महाराणा प्रताप सिंह चौकाचे सुशोभीकरण आणि अश्वारूढ पुतळा उभारणीचे निश्चित झाले होते.त्यानंतर 5 मार्च http://localhost/news/public/uploads/2019 रोजी महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीला मंजुरी मिळाली.
20 फूट उंचीच्या चौथऱ्यावर 16 फूट उंचीचा महाराणा प्रताप यांचा भव्य आणि शानदार पुतळा असून पुतळ्याचे साडेचार टन वजन आहे.पुतळा पूर्णता कास्याने बनविला आहे.तसेच महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आजूबाजूला भिंतीशिल्पे लावण्यात आली आहेत.धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी हा 16 फूट उंचीचा पुतळा बनविला आहे.
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. असलम शेख, , मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, तसेच आमदार श्री. सुनील शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता श्री. रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री. यशवंत जाधव, ई प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका श्रीमती सोनम मनोज जामसुतकर, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स