ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार.....!

वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार.....!

प्रकाशन: 15 Jan 2022 10:58 AM
वाचन संख्या 133

🔴 भाजपा प्रदेश कार्यालयीन सचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार

      वेंगुर्ले/ विवेक परब : वेंगुर्ले तालुका भाजपाच्या वतीने वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा काल सत्कार भाजप कार्यालयीन सचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आले.

वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, तालुका सरचिटणिस बाबली वायंगणकर,मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के. जी. गावडे, अजय गडेकर आदी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचा कै. प्रभाकर अनंत उर्फ शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त भरत सातोस्कर, कै. अरुण काणेकर स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त मॅक्सी कार्डोज, कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त विनायक वारंग, कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती आदर्श महिला जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त सिमा मराठे, बाबासाहेब आंबेडकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त दिपेश परब व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त महादेव उर्फ आपा परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शरदजी चव्हाण, बाबली वायंगणकर, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल यांनी  मनोगत व्यक्त करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्ती सिमा मराठे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार बाळू देसाई यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स