ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिष्यवृत्ती परीक्षेत विक्रम मेहेंदळे याने मालवण तालुक्यात स्थापला विक्रम...!

शिष्यवृत्ती परीक्षेत विक्रम मेहेंदळे याने मालवण तालुक्यात स्थापला विक्रम...!

प्रकाशन: 08 Jan 2022 03:35 PM
वाचन संख्या 353

कु.विक्रम हा मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध मेहेंदळे व डॉ. सौ. वीणा  मेहेंदळे यांचा मुलगा…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे या प्रशालेतील इयत्ता आठवीतील विध्यार्थी कु. विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सहावा तसेच मालवण तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या परीक्षेसाठी विक्रमला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .किशोर देऊलकर व इतर शिक्षकांचे, पालकांचे मार्गदर्शन लाभले. विक्रम हा मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध मेहेंदळे व डॉ. सौ. वीणा  मेहेंदळे यांचा मुलगा आहे.  विक्रमच्या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रकाश  परब, स्कुल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगांवकर, अशोक मसुरेकर ,  श्री.बाबाजी भोगले आणि सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स