ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लायन्स क्लब मालवणच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ संपन्न.

लायन्स क्लब मालवणच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ संपन्न.

प्रकाशन: 01 Aug 2021 06:46 PM
वाचन संख्या 131

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब हा मोठा समूह असून या सामाजिक संस्थेत सदस्यांनी एक कुटुंब म्हणून काम करावे. लायन्सच्या सदस्यांनी जबाबदारी स्विकारून समाजासाठी काम करावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे शपथ प्रदान अधिकारी ला. श्री. ओंकार फडके यांनी लायन्स क्लब मालवणच्या पदग्रहण व शपथविधी समारंभात बोलताना केले.प्रामाणिकपणा,निष्ठा आणि जबाबदारी ह्या तीन मूल्यांवर कोणत्याही सामाजीक संस्थेमध्ये काम केले तर ते समाजासाठी संपूर्ण उपयुक्त ठरते असेही त्यांनी नमूद केले.

लायन्स क्लब मालवणच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ शपथ प्रदान अधिकारी ला. श्री. ओंकार फडके यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथील दैवज्ञ भवनमध्ये आज रविवारी संपन्न झाला. प्रारंभी ओंकार फडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन ला. अशोक देसाई, मावळते अध्यक्ष ला. विराज आचरेकर, नूतन अध्यक्ष ला.विश्वास गावकर, नूतन सचिव ला. सौ. जयश्री हडकर, नूतन खजिनदार ला.सौ. अनुष्का चव्हाण ला. गणेश प्रभुलीकर,ला. रुजारीओ पिंटो सौ वैशाली गावकर आदी उपस्थित होते.

यावेळी ओंकार फडके यांनी नूतन अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव सौ. जयश्री हडकर, खजिनदार सौ. अनुष्का चव्हाण, सहसचिव सोनाली पाटकर, सहखजिनदार सौ. दीक्षा गावकर यांच्यासह संचालक मंडळातील नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत त्यांच्याकडे पदभार सोपविला. तर लायन्स क्लब मध्ये दाखल झालेल्या नवीन सदस्यांना देखील शपथ देण्यात आली.

यावेळी मावळते अध्यक्ष विराज आचरेकर यांनी वर्षभरातील कामाची माहिती दिली. यावेळी झोन चेअरमन अशोक देसाई यांनीही मालवण लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले. नूतन अध्यक्ष ला.श्री. विश्वास गावकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवत म्हणले की यापूर्वी सचिव म्हणून काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले, व त्यातूनच ते सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडू शकले. आता अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी अधिक वाढली असून तन, मन व धन अर्पून सर्व सदस्यांच्या सहकार्याने संस्थेमार्फत समाजासाठी काम करू, असेही गावकर म्हणाले. यावेळी जयश्री हडकर व अनुष्का चव्हाण यांनीही त्यांची मनोगते व्यक्त केली.

यावेळी लायन्स क्लब मधील सदस्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच जास्त वर्षे क्लब मध्ये काम करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय घाटवळ, गणेश प्रभुलीकर यांनी केले. तर आभार जयश्री हडकर यांनी मानले. यावेळी लायन्स क्लबचे महेश अंधारी, रुजरिओ पिंटो, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, अरविंद सराफ, महेश कारेकर, मुकेश बावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, उमेश शिरोडकर, नाना साईल, सौ. वैशाली शंकरदास, सौ. मीना घुर्ये, सौ. वैशाली गावकर, सौ. अंजली आचरेकर, सौ. राधिका मोंडकर, रूपा कांदळगावकर, स्नेहा जामसंडेकर, रत्नागिरीचे आपा वळंजू, सावंतवाडीचे श्री. स्वार आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स