सिंधुदिनांक
५ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
१६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
१९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.
१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)