पंधरा ऑगस्ट रोजी मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशनचा वर्धापनदिन सोहळा...
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पावधीतच सेवाभावी संस्था म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मालवणच्या मातृत्व आधार फाऊंडेशन ह्या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मालवण वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण सभागृह येथे पार पडणार आहे. मालवणच्या मातृत्व आधार फाऊंडेशन या संस्थेने गेल्या वर्षभरात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. या संस्थेने कोरोना काळातही झोकून देऊन काम करत सेवाकार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून समाजात आपला ठसा उमटवला आहे. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. विजय शेट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून तर वृत्त निवेदक श्री. ऋषी देसाई, उद्योजक श्री. दत्ता सामंत, मालवणचे नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, (एम.एस.डब्ल्यू) चारुशीला देऊलकर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री. संतोष लुडबे, अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)