ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगण!

विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगण!

प्रकाशन: 03 Jan 2022 06:12 PM
वाचन संख्या 54

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेच्या खुल्या मैदानामध्ये नुकताच विद्यार्थी व शिक्षकांसाठी मालवण येथील खगोल तज्ज्ञ मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे आकाश दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. निरभ्र आकाश, मंदार माईणकर यांचे खगोल शास्त्राविषयीचे सखोल ज्ञान, विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

मंदार माईणकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे अवकाशातील ग्रह व तारे, आकाशगंगा, धूमकेतू याबद्दल शास्त्रीय माहिती दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी प्रत्यक्ष संवादाद्वारे अवकाशस्थ ग्रहताऱ्यांविषयीच्या शंकाकुशंकांचे निरसन केले. त्यानंतर प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडवून आणले. शनि, गुरु, देवयानी दीर्घिका, काही तारकासमुह , नेब्युला हे प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आकाशातील अनेक ग्रहताऱ्यांची ओळख झाली. ध्रुव तार्‍याच्या स्थानावरुन दिशा कशा ओळखायच्या, याचेही ज्ञान मिळाले. कृष्णविवर, नवीन तार्‍यांचा जन्म याबद्दल शास्त्रीय माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यास मदत झाली.

ओझर विद्यामंदिरमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी मेहनत घेतली. या अवकाश दर्शन कार्यक्रमाचा प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गानेही आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेच्या वतीने अनेक नवनवीन उपक्रम राबवत असल्याबद्दल पंचक्रोशीतील पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेच्या संस्थेच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे असे उपक्रम राबविणे शक्य होत असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स