पळसंब येथे सावित्री बाई फुले जयंती निमित्त बालिका दिन व महिला शिक्षक दिन साजरा
आचरा/विवेक परब : आज पळसंब शाळा नं.१ येथे सकाळी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन व महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पळसंब सरपंच श्री. चद्रकांत गोलतकर , केद्रप्रमुख श्री. नितिन कदम, मुख्याध्यापिका सौ. मानसी असरोडकर, शिक्षिका सौ . अपूर्वा पवार, अगंणवाडी सेविका निकिता पुजारे, सुचिता सावंत , संगीता पळसंबकर, मदतनिस गोलतकर, परब, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री .राजू चव्हाण, महिला, गावातील मुली, शाळेतील मुले उपस्थित होती त्यावेळी श्री. नितिन कदम, निकिता पुजारे, असरोडकर मॅडम, पवार मॅडम यानी सावित्री बाई फुले यांच्या विषयी विचार व्यक्त केले तसेच सरपंच श्री. चद्रकांत गोलतकर यानी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)