ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून पूरग्रस्तांना मदत

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून पूरग्रस्तांना मदत

प्रकाशन: 12 Aug 2021 12:32 PM
वाचन संख्या 54

बांदा | राकेश परब : संस्थेचे कार्य खूपच छान असून, अशा कठीण काळात आपण करत असलेले कार्य पाहून प्रत्येकाला समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळेल अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी गौरवोद्गार काढले.
कोरोनो मुळे सर्व ठीकाणी कठीण परिस्थिती असताना कोकणासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विनाशकारी महापूर आला आणि हजारो कुटुंबे उध्वस्त झाली. लाखो लोक बेघर झाले आणि उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली. घरदार, गुरे ढोरे वाहत असताना आणि आपल्या कुटुंबातील व्यक्ती जमिनी खाली गाडले जात असताना हताश होऊन पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. घरात आणि दुकानात झालेले चिखल आणि घाणीचे साम्राज्य आणि पुराच्या पाण्याने वाहून गेलेले घरातील सामान यामुळे खावे तर काय? झोपावे कुठे? अंगावर काय घालायचे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. शहराची शहरे उध्वस्त करणाऱ्या या पुराने चिपळूण आणि आजूबाजूच्या गावात होत्याचे नव्हते करून टाकले. कोकणच्या या कठीण काळात सर्वच स्तरातून त्यांना परत उभारी देण्यासाठी मदत करणाऱ्यांचे हात पुढे आले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली १० वर्षे महाराष्ट्रात कार्यरत असलेली , कोकणातून सुरु झालेली आणि कोकणच्या सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणारी संस्था असून चिपळूणच्या या मदत कार्यात अग्रक्रमाने मदतीला पुढे आली. कोकण संस्थेच्या २८ कार्यकर्त्यांची टीम ६५०० किलो धान्य, शेकडो कपडे, हजारो पाण्याच्या बाटल्या, आरोग्याचे साहित्य, भांडी, सॅनिटरी नॅपकिन्स, खाऊ आणि साफसफाईचे सामान आदी घेऊन काल चिपळूण मध्ये मदत कार्यास दाखल झाली.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात गरीब,कातकरी, निराधार, बेघर, आदिवासी अशा ३००० हुन अधिक कुटुंबाना रेशन वाटप करण्यात आले आहे
या समाज कार्यात संस्थेला अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिंधुरत्न मंडळ पालघर,आनंद फाउंडेशन, एक घास भुकेलेल्यांसाठी,कारगिल अमर जवान स्मारक समिती, जीवन विकास शिक्षण संस्था,साहस युथ फाउंडेशन, श्रीकृष्ण फूड इक्विपमेंट्स, पिंपळी बुद्रुक ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले.
दळवटणे या गावापासून सुरु झालेल्या या उपक्रमात खेर्डी, वालोपे, बहादूर शेख नाका, मार्कंडी,पेठमाप, बहादूर शेख नाका,पोसरे, कळबस्ते, गोवळकोट, सती, उक्ताड, खेंड, कापसाळ तसेच शंकरवाडीतील शेकडो कुटुंबियांना संस्थेने मदतीचा आधार दिला.
यावेळी सहायक पोलीस अधिक्षक प्रदीप गीते, संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, सुरज कदम, सचिन धोपट, प्रवीण सुतार, प्रवीण विटमल, संतोष विटमल, मिलिंद मेस्त्री, सागर जांभळे, जीवन कुरूप, योगिता निजामकर, साक्षी पोटे, प्रीती पांगे, चेतन शीतप आदी उपस्थित होते तर या उपक्रमासाठी ,परेश राणे, वैभव सांडगे, श्रद्धा सांडगे,विश्वनाथ बेटकर, प्रसाद देवरुखकर, अर्चना शिंदे, महेश बिर्जे, अजित दळवी, शशांक सावंत,अक्षय ओवळे, अविनाश तोडणकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स