ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडी तालुक्यातील पुरग्रस्तांना सामाजिक संस्थेकडून जीवनाआवश्यक वस्तुंचे वाटप

सावंतवाडी तालुक्यातील पुरग्रस्तांना सामाजिक संस्थेकडून जीवनाआवश्यक वस्तुंचे वाटप

प्रकाशन: 12 Aug 2021 12:15 PM
वाचन संख्या 59

बांदा |राकेश परब : तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी घरात गेल्याने नुकसान झालेल्या विलवडे,बांदा,इन्सुली, वाफोली,माडखोल-धवडकी व सरमळे गावातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना विरार, ऊर्जा कुटूंब नालासोपारा, टाऊन्स आँफ कोकण ठाणे,अनोळखी नाती विरार-अंधेरी,दीवाने सामाजिक संघटना,महाराष्ट्र या संस्थां व मित्रमंडळानी धाव घेतली. या संस्थेच्या प्रतिनिधीनी व मित्रमंडळानी मुंबई व विरार येथुन सुमारे ५५० किलोमीटरचा प्रवास करीत सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील गावच्या पूरग्रस्त व शेतीचे नुकसान झालेल्या १२० हुन अधिक कुटुंबाना भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थीतीत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
कोरोनामुळे होरपळलेल्या सर्व सामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. त्यात पुरामुळे झालेल्या अरिमित हानीने अनेकांचे जीवनच उघड्यावर पडले आहे. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे पूरबाधितांचे अश्रु पुसत त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची शक्ती देण्यासाठी वरील संस्थांच्या प्रतिनिधीनी प्रत्यक्ष गावात भेट दिल्या. यामुळे पुरग्रस्त व गरीब शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यावेळी मुबंई व विरार येथील ओमप्रकाश नेरुरकर, भोरेश सांडव,अनंत मालवणकर,बाळ वेळकर, विलास सावंत, हर्षाला सावंत,रविंद्र गुरव,शरद जांभळे,अनिल नरे , संतोष नेरुरकर आदी उपस्थीत होते.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, तूरडाळ, तेल, रवा, चहा पावडर, बटाटा, कांदा,मुग, शेवया, चणे, कपड्याचे व अंगाचे साबण, मसाला, चादर, टाँवेल, तसेच यामध्ये ४८ शेगडी आदी जिवनावश्यक व गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या. या वितरणासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश सावंत बांदा, विलवडे माजी उपसरपंच प्रकाश दळवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत, देवसु तसेच स्थानिक ग्रामस्थाचे सहकार्य सहकार्य लाभले. पुरग्रस्तांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 303

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स