ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वडाचापाट शांतादुर्गा हायस्कुलमध्ये गणित दिन साजरा

वडाचापाट शांतादुर्गा हायस्कुलमध्ये गणित दिन साजरा

प्रकाशन: 24 Dec 2021 09:45 AM
वाचन संख्या 86

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणिती रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच प्रतिकृती, तक्ते, गणित विषयाशी निगडित संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर, आणि दयानंद देसाई(शेतीतज्ञ) यांची उपस्थिती लाभली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जे.एन.पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी शकुंतला देवी (भारतीय गणिततज्ञ), श्रीनिवास रामानुजन, आर्यभट्ट, भास्कराचार्य,पायथागोरस आदी गणिततज्ञांच्या चरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाला गणित शिक्षक प्रसाद कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसाद कुबल यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकवली. रामानुजन यांनी कशा रितीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणितीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगतानाच विद्यार्थ्यांना गणिती कोडे घालून मनातील संख्या कशी ओळखता येते याचा उलगडा केला. या कार्यक्रमातील स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर, सौ.वेदिका दळवी,आणि प्रीती सनये या लाभल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कुबल यांनी केले. तर आभार सौ.वेदिका दळवी यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स