ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रसन्ना बाळू देसाई: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा च्या वतीने नगराध्यक्ष राजन गिरप यांना  " सुशासन अटल पुरस्कार  " देवुन सन्मानित करणार  .....

प्रसन्ना बाळू देसाई: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा च्या वतीने नगराध्यक्ष राजन गिरप यांना " सुशासन अटल पुरस्कार " देवुन सन्मानित करणार .....

प्रकाशन: 23 Dec 2021 11:05 PM
वाचन संख्या 87

प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , अभियान संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग .

ब्यूरो न्यूज- विवेक परब : संपूर्ण देशात २५ डिसेंबर या दिवशी भाजपा च्या वतीने श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती *सुशासन दिवस* म्हणून साजरी केली जाणार आहे . यावर्षीही सुशासन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन प्रदेश भाजपाने केले आहे . त्यामध्ये निमंत्रितांचे संमेलन व व्याख्यान , अटलजींच्या प्रतीमेचे पुजन , ग्रंथालयास अटलजींच्या पुस्तकाचे संच भेट देणे , स्वच्छता अभियानाचे आयोजन करणे , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात घेतलेले निर्णय तसेच योजनांची माहिती सर्वसामान्यांना देणे , E श्रम कार्ड वितरीत करणे , त्याचप्रमाणे मनपा , नपा , जि.प. , पंचायत समिती मधील सुशासनातील यशासाठी उत्तम कामगिरी केलेल्या भाजपा लोकप्रतिनिधी ची निवड करुन त्यांना *सुशासन अटल पुरस्कार* देवुन सत्कार करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे . याच अनुषंगाने वेंगुर्ले शहरातुन आम जनतेतून निवडुन आलेले भाजपा चे यशस्वी नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार करण्यात येणार आहे . नगराध्यक्ष राजन गिरप यांनी गेल्या पाच वर्षांत वेंगुर्ले शहराचा कायापालट केला .तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी विकास कामे करून , वेंगुर्ले पर्यटन शहर बनविले .त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा दर्जा टिकवून ठेवत स्वच्छतेचे देशपातळीवरील पुरस्कार मिळविले . त्याचप्रमाणे कला – क्रीडा – सांस्कृतिक – सामाजिक उपक्रम राबवुन जनमानसात वेंगुर्ले नगरपरिषदेकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला .या कार्याची दखल घेऊन वल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील *सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार* राजन गिरप यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला . याच कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी १० = ३० वाजता तालुका कार्यालयात नगराध्यक्ष राजन गिरप यांना ” सुशासन अटल पुरस्कार ” देवुन सन्मानित करणार असल्याचे अभियान संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स