चिंदर-नागोचिवाडी येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व बापूजी(दादा) दामोदर पडवळ यांचे दिर्घ आजाराने निधन
चिंदर/विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व बापूजी उर्फ दादा पडवळ(50) यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. दादा म्हणून सुपरिचित असणारे बापूजी दिलदार व समाजसेवी म्हणून प्रसिध्द होते ते भाजपचे मालवण तालुक्यातील जेष्ठ नेते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहिणी असा मोठा परिवार आहे, भारतीय जनता पार्टी चारकोप कांदिवलीचे नेते महामंत्री योगेश पडवळ यांचे ते बंधू होत. त्याच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)