ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा प्रशासनाची नागरीकांसाठी नविन ई- संजिवनी ओपीडी सुविधा

जिल्हा प्रशासनाची नागरीकांसाठी नविन ई- संजिवनी ओपीडी सुविधा

प्रकाशन: 21 Dec 2021 02:58 PM
वाचन संख्या 92

ओरोस /प्रतिनिधी : जिल्ह्यातील जनतेला घरी राहून त्यांच्या आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा म्हणुन ई- संजीवनी ओपीडी ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच कोविड व नॉन कोविड रुग्णांना घरी सुरक्षित राहुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत उपचार सल्ला मसलत करण्यात यावे.या कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे. जनतेने ॲण्ड्रोइड मोबाईल मध्ये ई-संजीवनी ओपीडी हे ॲप इंन्स्टॉल करुन या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंत 330 रुग्णांनी घर बसल्या या सेवेचा लाभ घेतलेला आहे.

हा लाभ घेण्यासाठी डॉक्टरांशी सल्ला मसलत करण्यासाठी खालील टप्यांचे पालन करावे, आपला मोबाईल नंबर सत्यापित, व्हेरीफाय करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटिफीकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करा. ई- प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा . तरी जनतेने तसेच रुग्णांनी ई-संजीवनी ओपीडी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स