ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा दिव्यज्योती प्रशालेच्या मार्गावर गव्यांची दहशत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा दिव्यज्योती प्रशालेच्या मार्गावर गव्यांची दहशत

प्रकाशन: 19 Dec 2021 05:55 PM
वाचन संख्या 27

बांदा/राकेश परब : बांदा येथील दिव्यज्योती इंग्लिश मिडियम प्रशालेनजीक राम मंदिरासमोरील मार्गावर सातत्याने गव्याचे दर्शन होत आहे. गव्यांचा कळपच या भागात कार्यरत असून मार्गावरुन ये जा करणार्‍या ग्रामस्थांच्या नजरेस कळप पडताे. याच मार्गावरुन प्रशालेचे शेकडो विद्यार्थी येजा करीत असतात. गाड्या किंवा मनुष्यांना गवे घाबरत नाहीत. रस्त्यावरच ठाण मांडून राहत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाफोली येथील शैलेश गवस हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना गवा नजरेस पडला. बर्‍याच वेळानंतर गवा रस्त्यापासून काहीसा दूर गेला. गवस पुन्हा शाळेतून येत असताना सदर गवा पुन्हा त्याच ठिकाणी निदर्शनास पडला. काही विद्यार्थी याच मार्गाने चालत येजा करतात. गव्यांच्या सातत्यपूर्ण वावरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

गव्यांचा कळप भरवस्तीपर्यंत येत असल्याची माहिती वनविभागाला दिल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स