विरण येथे १८ रोजी दत्तजयंती उत्सव..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विरण बाजारपेठ दत्त मंदिर येथे शनिवार १८ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वा श्रींची पूजा, १२ वा. आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ३ वा. कलावती आईचे भजन, सायंकाळी ७ वा. आरती, रात्री ९ वा. श्री भवानी सिद्ध भराडी बाल दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा भक्ती महिमा हा नाट्य प्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन तरुण विकास मंडळ विरण बाजार यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)