ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मा.समाजकल्याण  सभापती अंकुश जाधव यांची शिरशिंगे दलित वस्तीला भेट.

मा.समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची शिरशिंगे दलित वस्तीला भेट.

प्रकाशन: 10 Dec 2021 07:12 PM
वाचन संख्या 28

ओरोस /प्रतिनिधीता: शिरशिंगे दलित वस्तीतील प्रलंबित विकास कामे आणि समस्या जाणून घेण्यासाठी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव ग्रामपंचायत आणि दलित वस्तीला अधिकारी यांच्यासमवेत भेट दिली. सभापती जाधव यांच्या अचानक दौऱ्या मुळे सावंतवाडी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. जाधव यांनी विकास कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करा असे आदेश ग्रामसेवक राऊळ यांना केले.

शिरशिंगे येथील मुंबई स्थित विकास मंडळाचे अध्यक्ष यशवंत परब यांनी सभापती जाधव यांना गावात दौरा करून विकास कामे आणि ग्रामस्थ यांच्या समस्या जाणून घ्या अशी विनंती केली होती. त्यानुसार सभापती जाधव यांनी शिरशिंगे येथे ग्रामपंचायत ला भेट दिली. ग्रामसेवक राऊळ यांच्या कडून दलित वस्तीची सविस्तर माहिती घेतली. त्याच प्रमाणे दलित वस्तीतील ग्रामस्थांनी विकास कामे व समस्या चर्चेतून उपस्थित केल्या. प्रामुख्याने समाजमंदिर, विहीर दुरुस्ती, रस्ता नूतनीकरण, स्टेज आणि मंडप, नवीन घरकुल, घरदुरुस्ती आदी प्रश्न मांडले. या विकास कामांचे लेखाशीर्षक निहाय प्रस्ताव जी. प. सादर करा. आवश्यक असेल तिथे ग्रामपंचायत चा निधी खर्च करा असे आदेश सभापती जाधव यांनी विस्तार अधिकारी लोंढे व ग्रामसेवक राऊळ यांना दिले. त्यानंतर जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समवेत दलितवस्तीला भेट दिली. नादुरुस्त समाजमंदिर, विहीर, रस्ता आदीची पाहणी करण्यात आली. यावेळी सभापती जाधव यांच्या समवेत विस्तार अधिकारी लोंढे, ग्रामसेवक राऊळ यशवंत परब, मधुकर देसाई, आत्माराम गावडे, संजय नाईक, श्री राऊळ, श्री राणे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.सोबत फोटो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स