चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटणकर यांच्याकडून चिंदर पालकरवाडी शाळेतील मुलांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप.
चिंदर/विवेक परब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना चिंदर पाटणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पंचक्रोशीत ज्ञात असलेले शिक्षणप्रेमी नागरिक श्री.गजानन श.पाटणकर यांनी कै. शशिकांत श्रीधर पाटणकर यांच्या स्मरणार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस चे मोफत वाटप केले. शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा, सहल, इतर सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी हे ड्रेस अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तसेच श्री.गजानन पाटणकर : यांनी शाळेच्या नावाचा बोर्ड तयार करण्यासाठी रोख रक्कम 1500/- रु मदत केली. यांचे शाळा व विद्यार्थी हितासाठी अशाप्रकारचे मोलाचे योगदान नेहमीच मिळत असते. शाळेस केलेल्या या दातृत्वाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री.उदय दिक्षित, केंद्रप्रमुख श्री प्रसाद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वरा , शाळा व्यव. समिती अध्यक्षा सौ.दिक्षा पालकर शिक्षण प्रेमी श्री.रविंद्र लब्दे, सौ. मनवा चिंदरकर, मुख्याध्यापक श्री.शिवानंद सोलापुरे सहशिक्षक श्री.नंदकुमार जुंदळे ,पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी आदींनी त्यांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)