हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीसह पगार.
आचरा /विवेक परब: राज्यातील एसटी महामंडळाच्या कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आज मंगळवारी होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हा पगार सुधारित वेतनवाढीनुसार होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याचे समजते. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनानुसार पगार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं नियमित कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा आज सुधारित वेतनानुसार पगार होणार आहेत. सध्या १९ हजार कर्मचारी आंदोलनानंतर कामावर रुजू झाले आहेत. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर हजर होणं बाकी आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)