ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त...

बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त...

प्रकाशन: 04 Dec 2021 11:00 AM
वाचन संख्या 32

बांदा /राकेश परब : रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि संपूर्ण सिंधुदुर्गात रक्तदान,अवयवदान देहदान व रुग्णमित्र चळवळ उभी केल्याने ‘बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन’ महाराष्ट्र यांचा राष्ट्रीय पुरस्कार २०२१ तासगाव येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच गोवा, बेळगाव, मुंबई,पुणे वा उर्वरीत महाराष्ट्रातही रक्तसेवा दिली आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचे सर्वाधीक दाते शोधण्याचे कामही संस्थेने केले आहे, या जागतिक दुर्मिळ रक्तगटाचे दाते आज प्रतिष्ठानकडे आहेत,आवश्यकतेनुसार ते जिल्हा राज्यच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रक्तदान करु शकतात, प्रतिष्ठानने ही “बॉम्बे ब्लड ग्रुप” रक्तदाते शोध मोहिम सातत्याने सुरु ठेवली आहे. या सर्व कार्याची दखल घेवुन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने प्रतिष्ठानला राष्ट्रीय पुरस्काराचे मानपत्र देवून सन्मानीत केले आहे. यावेळी सुधीर कांबळी व सपना पडवळ या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदात्यांनाही नॅशनल अॕवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सांगली तासगाव येथील सोहळ्यात देशातील २२ राज्यातील संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून कार्यकर्ते उपस्थित होते,त्याच प्रमाणे बिहार, राजस्थान, छत्तीसगड, खांडवा,जम्मु, पंजाब, हिमाचल प्रदेश, हैदराबाद तेलंगणा,सहारनपुर उत्तर प्रदेश, इत्यादी २२ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक विक्रम यादव,धनंजय कुलकर्णी,चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, तहसीलदार रवींद्र रांजणे, माय लॅबडिस्कवरी सोल्युशन चे श्रीकांत पाटोळे, पोलीस अधीक्षक अश्विनी शेंगडे, संजीव कुलकर्णी , मनोज इंगळकर सर आणि अमोल पवार सर उपस्थित होते. हा पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते सुधीर कांबळी व सपना पडवळ, तसेच संस्थेचे रक्तमित्र रामदास मालवणकर या टीमने स्वीकारला. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रतिष्ठानचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी सर्व टिमचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स