ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शहापुर मध्ये आदिवासी मुलांसाठी उपक्रम....!

शहापुर मध्ये आदिवासी मुलांसाठी उपक्रम....!

प्रकाशन: 02 Dec 2021 04:16 PM
वाचन संख्या 44

बांदा |राकेश परब : शिक्षणाने माणूस घडतो हे खरे असले तरी काही विभागात कोविड मुळे गेले २ वर्षे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, शहरी आणि निम शहरी भागात ऑनलाईन शिक्षणांचे धडे गिरवले जात आहेत कारण त्यांच्याकडे त्या दर्जाच्या मोबाइलची असलेली उपलब्धता आणि इंटरनेटची सुविधा आहे. शहापूर तालुक्यातील बऱ्याच गावात ना इंटरनेट आहे ना ही दळणवळणाची सुविधा. अशातच आलेल्या कोरोनामुळे सर्व वाहतूक बंद, ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा अभाव यामुळे येथील विद्यार्थी वर्ग आणि शाळेत जाण्याची इच्छा असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत हे कोकण संस्थेने रोटरी क्लब बॉम्बे चेंबूर वेस्टच्या व्यवस्थापनाला कळवले आणि त्यांनी शेंडेगावात युवा किरण उपक्रम सुरू करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आणि ते आज पूर्णहि केले. गावातील काही अल्पशिक्षित पालक आणि मोबाईलची कमतरता यामुळे या मुलांना शिक्षण घेणे कठीण असल्यामुळे या उपक्रमाची नितांत आवश्यकता होती आणि तो चालू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कोकण संस्था आणि रोटरी क्लब चेंबूरचे मी धन्यवाद देते असे ग्रामस्थ सौ. नेहा धाकटे यावेळी म्हणाल्या.या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवणे हा उद्देश तर आहेच पण त्याचबरोबर मूल्य शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, आत्मविश्वासात वाढ करणे अशी अनेक उद्दिष्टे साध्य करण्याचे लक्ष्य असल्याचे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या कॉर्डीनेटर सौ. तारा सांगळे यांनी सांगितले.शहापूर हा आदिवासी भाग असून येथिल विद्यार्थ्यांसाठी जास्तीतजास्त मदत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे श्री श्रीकांत भट यांनी सांगितले.रोटरी क्लब बॉम्बे चेंबूर वेस्टचे श्री. श्रीकांत भट आणि कल्याणी मेहेंदळे यांच्या शुभहस्ते दिनेश शीद यांच्याकडे टॅब देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सौमित्र भट आणि २४ शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स