मिशन आधार या सामाजिक संस्थेकडून पुरग्रस्तांना धान्य वाटप
बांदा | राकेश परब : बांदा शहर व पंचक्रोशीतील पुरबाधित १०० हुन अधिक कुटुंबाना ‘मिशन आधार’ या सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला आहे. ‘मिशन स्थिरता’ या स्लोगनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तसेच शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बांदा-बांदेकरवाडी, शेर्ले-कापईवाडी, धुरीवाडी, इन्सुलि-कुडवटेम्ब, सरमळे, विलवडे, ओटवणे येथील पुरबाधितांना प्रत्यक्ष घरी जाऊन मदत देण्यात आली. मिशन आधारचे प्रमुख सम्राट कुडतरकर यावेळी बोलताना म्हणाले की, आतापर्यंत मिशन आधारच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. ओरोस कोविड सेंटर येथे सलग ५१ दिवस मोफत अन्नदानाचा उपक्रम घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या बांदा पंचक्रोशीतील लोकांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
यावेळी पुरबाधित लोकांना जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य तसेच शेर्ले येथील कोविड सेंटरला पिण्याचे पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मिशन आधारचे सम्राट कुडतरकर, आनंद पूनाळेकर, विश्राम केळुसकर, वैभव घाग, ऋषिकेश खानोलकर, प्रसाद नाडकर्णी, अमेय पेडणेकर, अनिकेत सावंत, सागर तुळसकर, नागेश नार्वेकर, वेंकटेश साळगावकर, ईश्वरी ठाकूर, चिंतामण ठाकूर, प्रणव धुरी, प्रथमेश डंबे, अवधूत राणे, अक्षय नदीवडेकर, हर्षद पाठक, पत्रकार निलेश मोरजकर, संजय भाईप आदी उपस्थित होते. यावेळी संदीप बांदेकर, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी सहकार्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)