'गांव तिथे किसान मोर्चा' कार्यक्रमाची मालवणातून सुरुवात..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या ‘गांव तिथे किसान मोर्चा’ या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक http://localhost/news/public/uploads/20.11.2021 पासून सुरु झाली.
‘गांव तिथे किसान मोर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात मालवण तालुक्यातून करण्यात आली आहे.सदर भेटी मध्ये किसान मोर्चा
जिल्हा अध्यक्ष श्री. उमेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. किशोर नरे
मालवण मंडल अध्यक्ष श्री.महेश सारंग, श्री.हरी केळुसकर , श्री.प्रकाश राणे , श्री.आर.एम. सातार्डेकर , श्री.पंढरी परब, श्री.संतोष मोडक , श्री.विजय परब, श्री.ज्ञानेश्वर परब, श्री.जयवंत परब, श्री.मिलिंद लोहार हे सहभागी होते.
सदर गांव भेट कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष श्री.उमेश सावंत यांनी शेतकरी बंधूनी सांगितलेल्या समस्यां चा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.तसेच सर्व शेतकऱ्यांनी भा.ज.प.किसान मोर्चा मध्ये सहभागी होऊन शेतकरी विकासासाठी कामे करण्याचे आवाहन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)