ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उमेद फौंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षांचे आवाहन..

उमेद फौंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षांचे आवाहन..

प्रकाशन: 19 Nov 2021 11:07 AM
वाचन संख्या 45

बांदा | राकेश परब : उमेद फौंडेशन ही संस्था अनाथ, वंचित व गरजू असणाऱ्या हुशार विद्यार्थांना शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक भान जपणाऱ्या दानशूर लोकांच्या मदतीने कार्यरत आहे. आजपर्यंत नव्वदहून अधिक विद्यार्थीं या मदतीचा लाभ घेत आपले शिक्षण पूर्ण करत आहेत .
कोरोना संकट काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गरजू हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी २०२० सालाप्रमाणे याही वर्षी २०२१ साली उमेद शिष्यवृत्ती जाहीर करत आहोत.यासाठी२२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
बारावीनंतर व्यावसायिक व पदवी शिक्षण घेत असलेल्या गरजू हुशार मुलांनी उच्च शिक्षणासाठी या उमेद शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असे आवाहन उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केले आहे.
यामध्ये उमेद शिष्यवृत्ती,
कै. रामचंद्र कृष्णाजी खाडे शिष्यवृत्ती ,डाॅ विरेंद्र कानडीकर व सौ.मंजिरी कानडीकर शिष्यवृत्ती अशा १लाख ३० हजार रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असून या शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोनच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी राजेंद्र पाटील- 8888650077
सागर पेंडूरकर 9657162445
प्रदीप पाटील 9403875441, जे.डी.पाटील 8605703103 व मनोज गुंजाळ 9527164695 , सूर्यकांत चव्हाण 9022650725 ,नाना सारंग 7741049420 ,जाकीर शेख 9421558328 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स