मसुरे गांवचे ग्रामदैवत श्री भरतेश्वर मंदिर उजळले लक्षदिपांनी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे गांवचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून गेले आहे. यानिमित्त विधिवत पूजन झाल्या नंतर रात्री दीपोत्सवास प्रारंभ झाला. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होत आला असून दिव्यांच्या प्रकाशा सह देवलयास केलेल्या आकर्षक विधुत रोषणाईने मंदिर परिसर लखलखला आहे. रात्री उशिरा तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक तर दुसऱ्या दिवशी पहाटे गाडगे फोडून उत्सवाची सांगता होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)