स्वयंदीप संस्थेच्या मीनाक्षी निकम ठरल्या केशव सृष्टी पुरस्काराच्या मानकरी..!
दिव्यांग आणि विधवा महिलांच्या उत्कर्षासाठी झटणार्या कार्यकर्त्या…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सुप्रसिद्ध आणि मानाच्या अशा केशवसृष्टी संस्थेतर्फे दिला जाणारा केशव सृष्टी पुरस्कार यंदा स्वयंदीप संस्थेच्या मीनाक्षी निकम यांना विलेपार्ले- मुंबई येथे देण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशन आणि मनोबल संस्थेचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या हस्ते निकम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिव्यांग आणि विधवा महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम निकम यांनी केले आहे. यावेळी केशवसृष्टीचे अध्यक्ष एस एस गुप्ता, आणि निवड समिती अध्यक्ष रश्मी भातखळकर उपस्थित होत्या. प्रकाशाच्या मागे धावण्यापेक्षा दिव्यांग आणि विधवा महिलांना प्रकाशमान कसे करता येईल याकरता स्वयंदीप कार्य करते. प्रकाशाच्या मागे धावणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे. त्यामुळे मी प्रकाशमान होऊन हे कार्य सुरू केले आहे. दिव्यांग आणि विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा विश्वास निर्माण करण्याचे काम आम्ही करतो असे मीनाक्षी निकम यांनी आपल्या मनोगतात सांगितले. मान्यवरांनी यावेळी स्वयंदीप संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एक लाख रुपये व प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सूत्रसंचालन अमेया जाधव यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)