ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
स्पर्धा परीक्षांचा  'प्लान बी' देखील तयार ठेवण्याचे आय.पि.एस. अधिकारी सुब्रमण्य केळकर यांचे आवाहन..!

स्पर्धा परीक्षांचा 'प्लान बी' देखील तयार ठेवण्याचे आय.पि.एस. अधिकारी सुब्रमण्य केळकर यांचे आवाहन..!

प्रकाशन: 09 Nov 2021 08:15 PM
वाचन संख्या 55

फेसबुक लाईव्हद्वारा मार्गदर्शन

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले प्रास्ताविक

ओरोस | प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विशेषत: युपीएससीची परीक्षा देतांना प्रामाणिकपणे वृत्तपत्रे वाचावीत. वाचनाची सवयच ध्येयाकडे नेते. बेसीक पुस्तकांबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासने आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न करताना प्लॅन बी हा देखील तयार हवा, असे मार्गदर्शन मूळचे जिल्ह्यातील चिंदर गावातील परंतु, सद्या तामिळनाडू येथे कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सुब्रमण्य भालचंद्र केळकर यांनी केले.
यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रेरणा अंतर्गत आज आयपीएस अधिकारी सुब्रमण्य भालचंद्र केळकर यांचे फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन झाले.  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही स्वागत करुन श्री. केळकर यांचे अभिनंदन केले.
श्री. केळकर म्हणाले, मराठी भाषेतून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते. खुप मुलांची निवड झाली आहे. ज्यांच इंग्रजी चांगल आहे त्यांनी इंग्रजीतून परीक्षा द्यायला हरकत नाही. परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:साठी प्रत्येक जण नोट्स काढत असतो. तुमचं कौशल्यं आणि वेगळंपण अशा नोट्स काढताना जपलं पाहिजे. इंग्रजी वृत्तपत्र आणि मराठी वृत्तपत्र यांचे वाचन करताना छोटे छोटे सारांश लेखन करायला हवे. वैकल्पिक विषय निवड करताना त्या विषयांची तुमाला आवड हवी. जेणेकरुन समर्पण करुन अभ्यास करता येईल. त्याविषयाचे साहित्य उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या विषयाचे मार्गदर्शन ही असायला हवे. एनसीईआरटीची पुस्तक वाचन खूप गरजेच आहे.  कॉलेजची एन्जॉय करायची वर्ष देखील महत्वाची आहे. ती ती वर्ष त्या त्या वर्षी एन्जॉय करताना अभ्यासही महत्वाच आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना http://localhost/news/public/uploads/2011 पासून च्या प्रश्नपत्रिका पाहायला हव्या. टेलीग्रामवर युपीएससी मटेरीअल, साहित्य उपलब्ध आहे. युट्युबवर देखील बरंस मार्गदर्शन उपलब्ध आहे. अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न करताना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. यश नाही मिळाल म्हणून खचून न जाता त्यासाठी प्रर्यायी मार्ग हवा, ज्या ज्या क्षेत्रात जे जे कराल ते उत्तम कराल. त्यासाठी प्लॅन बी तयार हवा असा मौलिक संदेश श्री. केळकर यांनी दिला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स